चिऊताईसाठी भाजप-दळवी गटात राडा?, एकजण जखमी

पक्षाचे काम करण्यावरून जीवघेणा हल्ला

| अलिबाग | प्रतिनिधी |

शिंदे गट आणि भाजपचे अंतर्गत कलह जगजाहिर असतानाच रविवारी रात्री भाजप समर्थकाने निवडणूकीत पक्षाचे काम करण्यावरून दळवी गटाच्या कार्यकर्त्यावर जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चिऊताईचे काम करणार कि, छोटमचे यावरुन वाद विकोपला गेला असल्याची चर्चा सध्या परिसरात आहे. शैलेश नाईक असे या आरोपीचे नाव आहे. हा इसम भाजपचा कार्यकर्ता असून अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांचे समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरा इसम हा विरोधी पक्षात असूनही चिऊताईसाठी काम करणार असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.

Exit mobile version