ठाकरेंच्या रायगड जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

सध्या निवडणुकीमुळे वातावरण तापू लागलंय. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्यात. इंडिया आघाडीचे नेते, कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचारसभा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.2) इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ पोलादपूर, महाडममध्ये प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. याच रागातून अज्ञात विरोधकांनी अनिल नवगणे यांच्या गाडीची तोडफोड करीत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली. महाड येथील सभा संपल्यानंतर नवगणे इंदापूर मार्गाने लोणेरेच्या दिशेने जात होते. या दरम्यान हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात नवगणे यांच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले असून शिंदे गटाचे आ. भरत गोगावले यांच्यावर टीका केल्यामुळे हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version