आजोबांच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघड
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. पैशांसाठी जन्मदात्यानेच आपल्या पोटच्या दोन वर्षांच्या मुलाला विकले. मात्र, आजोबांच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघड झाला असून याप्रकरणी वडाळ पोलिसांनी आरोपी पित्यासह दोघांना अटक केली आहे.
मुंबईतील अँटॉप हिलच्या विजयनगर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमर धीरेन सरदार यांची मुलगी काजल हीने आरोपी अनिल पूर्वया याच्याशी दुसरं लग्न केले असून त्यांना एक दोन वर्षांचा मुलगाही होता. मात्र, काही दिवसांपूर्वी काजल हीचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलाचे आजोबा अमर हे नातवाला भेटण्याची मागणी करत होते, पण आरोपी अनिल दरवेळी काही ना काही कारण देऊन भेट टाळायचा. त्यामुळे अमन यांना संशय आला. तेव्हा त्यांनी चौकशी केली असता त्यांना समझले कि, अनिल यांनी जवळच राहणाऱ्या आस्मा शेख यांच्यामार्फत उत्तर प्रदेशातील एक दांपत्याला अवघ्या 1.6 लाखांसाठी आपला दोन वर्षांचा मुलगा विकला.
याप्रकरणी अमर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वडाळा टीटी पोलिसांनी पित्यासह चौघांवर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला आला असून दोघांना अटकही केली आहे.