कोठडीत एकटेपणा वाटतोय, टिव्ही लावून द्या; सुशील कुमारची मागणी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ज्युनिअर कुस्तीपटू सागर धनकड खून प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारने आता तिहार जेल प्रशासनाला आपल्या सेलमध्ये टीव्ही बसविण्याची मागणी केली आहे. सुशील कुमारने तिहार कारागृह प्रशासनाला लिहलेल्या निवेदनात म्हटलंय की त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीत तो एकमेव कैदी असल्याने मला एकटं वाटतंय, त्यामुळे मला टीव्हीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, जेणेकरून कुस्ती खेळात काय चाललंय याची माहिती मिळेल.

तिहार जेलचे डीजी संदीप गोयल म्हणाले, की जेल कारागृह प्रशासनाला सुशील कुमारकडून अर्ज आला असून त्यात त्याने टीव्ही लावण्याची मागणी केली आहे. सुशील कुमार यांच्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Exit mobile version