उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार

खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलचा उपक्रम

| पनवेल | वार्ताहर |

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने मेडिकवर हॉस्पिटल्स खारघर यांनी समाजात उत्तम कामगिरी बजाविणार्‍या महिलांचा सत्कार केला. स्वप्नाली कदम (भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्ष) यांना याठिकाणी गौरविण्यात आले.

दीपाली पाटील (पीआय, खारघर), स्नेहा पाटील (पीएसआय, खारघर), मीरा सुरेश (ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या), लीना गरड (फोरम, खारघर), स्वाती पांडुरंग नाईक (पत्रकार, झी न्यूज) आदी महिलांच्या कार्याचा या ठिकाणी सम्मान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान त्यांना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्वच क्षेत्रात महिलांनी बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीची ओळख करून देणारा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. या सर्वच महिलांचे कार्य आणि त्यांचा इथपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात गैरविण्यात आलेल्या महिलांचे कार्य खरोखरच वाखण्याजोगे असल्याची प्रतिक्रिया डॉ. माताप्रसाद गुप्ता (मेडिकवर हॉस्पिटल्सचे केंद्र प्रमुख) यांनी व्यक्त केली.

Exit mobile version