। उरण । वार्ताहर ।
उरण बेलापूर रोडवर असलेल्या श्री साई बाबा मंदिरात श्री साई देवस्थान तर्फे दर गुरुवारी विविध कार्यक्रम राबविले जातात. याखेरीज विविध शेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. यावेळी गुरुवारी (दि.17) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, सृष्टी राजेंद्र मुंबईकर व वैभवी महेंद्र सोमासे यांचा सन्मान करण्यात आला.
सृष्टी मुंबईकरची वयाच्या 19 व्या वर्षी भारतीय मर्चंन्ट नेव्हीमध्ये निवड झाली आहे. तब्बल 135 वर्षानंतर प्रथमच भारतीय मुलींना मर्चंन्ट नेव्हीमध्ये भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी देशभरातील 3 हजार 500 मुलींमधून महाराष्ट्रातून फक्त 19 मुलींची निवड झाली. यामध्ये उरण तालुक्यातील सृष्टी मुंबईकरची निवड करण्यात आली. तसेच, रायगड जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या जेवढ्या शाळा आहेत त्यात उलवे येथील शकुंतला रामशेठ माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीत शकत असलेली विद्यार्थिनी वैभवी सोमासे हिने संपूर्ण रायगड जिल्ह्यात आदर्श विध्यार्थिनी पुरस्कार मिळविला आहे. याबद्दल सातारा या ठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला होता. या यशा बद्दल या दोन्ही मुलींचा सााई देवस्थान वहाल तर्फे सत्कार करण्यात आला.






