फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धा

भारत-अफगाण यांच्यात सामना

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा पात्रता स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीतील भारताचे भवितव्य जून महिन्यात होणार्‍या कुवेत आणि कतार यांच्याविरुद्धच्या सामन्यांतून निश्‍चित होईल. दुसर्‍या फेरीतील पात्रता सामना भारत आणि अफगाणिस्तान याच्यात होणार आहे. अफगाणच्या तुलनेत भारतीय संघ बलाढ्य आहे, त्यामुळे विजय अपेक्षित असल्याने भारतीय संघ तिसर्‍या फेरीत स्थान मिळवेल, अशी अपेक्षा आहे.

गेल्या पाच वर्षांत भारतीय संघ चौथ्यांदा अफगाणिस्तानविरुद्ध लढणार आहे. 2019 आणि 2021 मध्ये विश्‍वकरंडक पात्रता फेरीत लढती झाल्या होत्या. दोन्ही वेळेस सामने 1-1 अशा बरोबरीत सुटले होते. मात्र, कोलकाता येथे झालेल्या आशिया कप पात्रता सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 2-1 असा पराभव केला होता. यात निर्णायक गोल साहल अब्दुल समदने केला होता.

भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने वेस्टवूड यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळूर एफसी संघातून आय लीग आणि फेडरेशन कप अशी दोन विजेतीपदे मिळवलेली आहेत. जवळपास सर्व भारतीयांचा खेळ वेस्टवूड जाणून असल्यामुळे उद्याच्या सामन्यात त्यांचा भर आक्रमणावर असेल; पण आम्हाला अधिक पुढचा विचार करावा लागेल, असे मत स्टिमॅक यांनी व्यक्त केले.

Exit mobile version