पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार

| पनवेल | वार्ताहर |

पंधरा वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून ती गर्भवती राहिल्याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगी पनवेल तालुक्यातील राहणारी असून, मार्च 2022 मध्ये आरोपी करण याने तिच्याशी ओळख केली आणि जंगलात भेटायला बोलावून जबरदस्तीने व मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच मे आणि जून 2024 दरम्यान आरोपी दिवेश कातकरी याने या मुलीसोबत लग्न करण्याची हमी देऊन ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानादेखील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दिवेश कातकरी याला अटक केली. दुसर्‍या आरोपीचा शोध सुरू आहे.

Exit mobile version