। गडब । वार्ताहर ।
वडखळ पोलीस ठाणे हद्दीत सर्वत्र होळीच्या सणाची धामधूम सुरु असताना येथील साई एकविरा चायनीज सेंटरवर झालेल्या मारामारीत चायनिज वरील नेपाळी मालकाने विजय हरीचंद्र पवार (वय 24) रा. वावे (नवेगाव) या तरुणाला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
विजय हा सोमवारी (दि.6) चायनीज खाण्यासाठी गेला होता. तेथे बिल देण्याच्या कारणावरुन पुष्पक तारासिंग याने विजयला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पुष्पक तारासिंग उर्फ पुष्पक नेपाळी यास अटक केली आहे.
या घटनेचा तपास पोलिस उपविभागिय अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक तानाजी नारनवार हे करत आहेत. या घटने नंतर मृत विजयच्या नातेवाईक व आदिवासी बांधवांनी पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी धाव घेतली व यातील आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी विजयची पत्नी तसेच कुटुंब व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.