। पनवेल । वार्ताहर ।
मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून मुंबईसह नवी मुंबईकरांना लाखो रुपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कंपनी विरोधात खारघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथील टोरेस कंपनीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याने मुंबईकरांना मोठा धक्का दिला होता. कारण या घोटाळ्यात मुंबईकरांचे कोट्यानवधी रुपये गुंतले आहेत. या घोटाळ्याची चर्चा सुरू असताना मुंबई नवी मुबंईत देखील आर्थिक घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे. एक्का मरीन ग्लोबल कल्चर कंपनी असे फसवणूक केलेल्या कंपनीचे नाव असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कंपनीच्या मालकाला बेड्या ठोकल्या आहेत. या कंपनीने कंपनीमध्ये भागीदारीचे आमिष दाखवून, महिन्याला 15 टक्के देण्याचे आश्वासन दिले होते.