किसान पंधरवड्यातून बळीराजाला आर्थिक बळ

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेतकरी, मच्छिमारांना उभारी देण्यासाठी बँकेच्यामार्फत कर्ज मेळावे सुरु केले आहेत. दोनशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांना कृषी कर्ज देऊन त्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांना किसान पंधरवडा या उपक्रमातून जोडण्यासाठी या योजना आहेत, असे प्रतिपादन बँक ऑफ बडोद्याचे महाव्यवस्थापक जगदीश तुंगारिया यांनी केले. अलिबागमध्ये भाग्यलक्ष्मी सभागृहात आयोजित कर्ज मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्य महाव्यवस्थापक ई बालसुब्रमणियम, उपमहाव्यवस्थापक विजया राठोड, विभागीय प्रमुख मेहूल दवे, मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सुरेश भारती, अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, अलिबाग शाखेच्या प्रबंधक श्‍वेता बनसुडे आदी मान्यवर, शेतकरी, मच्छिमार, महिला बचत गटातील महिला, बेरोजगार तरुण उपस्थित होते. यावेळी तुंगारिया पुढे म्हणाले, व्यवसायवाढीला चालना देण्यासाठी तसेच चालू आर्थिक पुनरुज्जीवन प्रक्रियेत भागीदार होण्यासाठी किसान पंधरवडांतर्गत कर्ज मेळावे सुरु केले आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य व्यवस्थापक ई. बालसुब्रमणियम, विभागीय प्रमुख मेहूल दवे, कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, सहाय्यक आयुक्त सुरेश भारती आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी 108 लाभार्त्यांना कर्ज मंजुरीचे पत्र वितरीत करण्यात आले.

Exit mobile version