। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबागची शाखा वडखळ येथे आर्थिक डिजीटल साक्षरता मेळावा दि. 5 जुलै रोजी आयोजित करण्यात केला होता. बँकेचे शाखाधिकारी एन.जी.म्हात्रे यानी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. त्या महिलांसाठी महालक्ष्मी ठेव, शेतकरी बांधवासाठी जय किसान ठेव, अल्प मुदत कज4, शैक्षणिक कर्ज, स्वरोजगार कर्ज, वाहन तारण व गृहोपयोगी वस्तूंसाठी प्रकल्पकर्ज, वैयक्तीक थेट कर्ज, बचत व चालू ठेव अशा अनेक योजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी बचत गटांच्या अनेक महिला हजर होत्या तसेच त्यांची या योजनांचा लाभ घेणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमांस शाखाधिकारी एन. जी. म्हात्रे, प्रीतम तेलंगे, माधुरी म्हात्रे, निशा म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, राजश्री म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, विविध महिला गटाच्या गट प्रमुख व सदस्या हजर होत्या.