अँन्टोनी गॅरेजेस कंपनीत आग

| रसायनी | प्रतिनिधी |

रसायनी पाताळगंगा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील चांवढोली गावानजिक असणाऱ्या अँन्टोनी गॅरेजेस प्रा.लि. कंपनीच्या यार्डला आग लागण्याची घटना घडली. या आगीमुळे कंपनीतील वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीमध्ये त्या ठिकाणी असलेल्या बसचे जळून सुमारे 36 लाख 25 हजार रुपये इतके नुकसान झाले आहे. याबाबत प्रविण मुंढे यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मपोना शेळके अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version