पीएनपी नाट्यगृहाला आग; अनेकांच्या डोळ्यात तरळले अश्रू

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील स्थानिक कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ असणारे, रसिकांना कायमच अनोख्या कार्यक्रमाची पर्वणी देणार्‍या पीएनपी नाट्यगृहाला बुधवारी (दि. 15) सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल तातडीने दाखल झाले. सध्या आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या अपघातामुळे अलिबागमधील अनेक कलांकारांसह रसिकांच्या डोळ्यातही अश्रू तरळल्याचे दिसून आले.

Exit mobile version