। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील फोर्ट परिसरातील फ्रीमेसन इमारतीला शनिवारी (दि. 15) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र मोठे नुकसान झाले आहे. तसेच, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.