| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील मालाडमध्ये 21 मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जनकल्याण नगरमध्ये या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत एका तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
सकाळी 11 वाजताच्या सुमारास कांदिवली पश्चिम येथील जनकल्याण नगर परिसरातील इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. आगीचे मोठमोठे लोट खिडकीतून बाहेर येताना दिसत आहेत. यावेळी जीव वाचवण्यासाठी एका तरुणीने तिसर्या मजल्यावरुन खाली उडी घेतली.
मुंबईतील मालाड येथील एका 21 मजली इमारतीला शनिवारी भीषण आग लागली. इमारतीच्या तिसर्या मजल्यावर आग लागली आणि वरच्या मजल्यापर्यंत या आगीचे लोट पोहोचले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. बहुमजली इमारतीतील बहुतांश फ्लॅटमध्ये कुटुंबं राहतात. आगीच्या ज्वाळांचे लोट पाहून तेथील लोकांमध्ये घबराट पसरली. तिसर्या मजल्याशिवाय वरच्या मजल्यावरही आग पोहोचली होती. मात्र, लवकरच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. ज्या फ्लॅटमध्ये आग लागली तेथील रहिवासीही पूर्णपणे सुरक्षित आहेत. आगीच्या कारणाचा तपास अधिकारी करत आहेत.