| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील काकळघर, वावडुंगी, वेळास्ते, तेलवडे, कोर्लई या पाच ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाकरिता 25 तर सदस्यपदाकरिता 116 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा प्रशासनाने दिली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांना फायदा झाला. गर्दी वाढेल त्यामुळे उमेदवारांना कोणतेही अडचण होणार नाही याबाबत मुरुड तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी-रोहन शिंदे व नायब तहसीलदार अमित पुरी यांच्याकडून दक्षता घेण्यात आली होती.
मुरुड-दरबार हॉल येथे निवडणूकी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता वावडुंगी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता सदस्यपदासाठी सात, तर सरपंचपदाकरिता दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. काकळघर ग्रामपंचायत सदस्यपदाकरिता 33, तर सरपंच पदाकरीता 5 उमेदवारी अर्ज, वेळास्ते ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता 11 तर सरपंच पदाकरीता 3 उमेदवारी अर्ज, तेलवडे ग्रामपंचायत सदस्यपदाकरीता 4 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. कोर्लई ग्रामपंचायत सदस्यपदाकरिता 30, तर सरपंच पदाकरीता 5 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
यावेळी मनोज भगत, दिपेश वरणकर, हरी भेकरे, नम्रता कासार, ऋषिकांत डोंगरीकर, शुभांगी करडे, तुकाराम पाटील, कृष्णा म्हात्रे, प्रमोद तांबडकर,राहिलं कडु,मनोज कमाने असंख्य सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित यावेळी उपस्थित होते. वावडुंगी ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस अजित बाळकृष्ण कासार व सरपंच पदाकरीता संजिवनी जयंत कासार आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, मनोज भगत, तुकाराम पाटील जयंत कासार भालचंद्र, जाळगावकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.