| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात सात ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी 41, तर सदस्यपदाच्या 69 जागांसाठी 244 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांची छाननी 5 डिसेंबर रोजी कर्जत तहसील कार्यालयात होणार आहे. कर्जत तालुक्यातील वावलोली, कोंडीवडे, उकरुळ, मांडवणे, दहीवली तर्फे वरेडी, कळंब आणि वेणगाव या सात ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
मांडवणे ग्रामपंचायत
एकूण जागा सात- 27 दाखल अर्ज, थेट सरपंच – आरक्षण -सर्वसाधारण – दाखल अर्ज 6. कळंब ः एकूण जागा 13- दाखल अर्ज 49, थेट सरपंच- आरक्षण -नागरिकांचा मागासप्रवर्ग – दाखल अर्ज -5. उकरूळ ः एकूण जागा नऊ- दाखल अर्ज 25, थेट सरपंच – आरक्षण – सर्वसाधारण महिला राखीव- दाखल अर्ज 5. दहिवली तर्फे वरेडी ः एकूण जागा 11 – दाखल अर्ज – 34, थेट सरपंच- आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव-दाखल अर्ज -6. वावळोली ः एकूण जागा नऊ- दाखल अर्ज – 17, थेट सरपंच- आरक्षण- सर्वसाधारण – दाखल अर्ज -7. कोंदिवडे ः एकूण जागा नऊ- दाखल अर्ज – 36, थेट सरपंच- आरक्षण- सर्वसाधारण – दाखल अर्ज -6. वेणगाव ः एकूण जागा अकरा- दाखल अर्ज – 56, थेट सरपंच – आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव – दाखल अर्ज -6.