| नवी मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (दि. 09) रोजी दहाच्या वाजताच्यासुमार एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाला. त्यांना तात्काळ झेन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सदरुद्दीन खान यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले. सद्द्रुद्दीन खान (50) असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून, ते मूळचे बेलापूरचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुद्द्रुद्दीन खान हे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास दादर येथून नवी मुंबईच्या दिशेने जात होते. त्यावेळी शीव पनवेल मार्गावरील चेंबूरच्या डायमंड गार्डनर परिसरात त्यांची चारचाकी सिग्नलला थांबली होती. तेवढ्यात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या आणि हल्लोखोर घटनास्थळावरून पसार झाले”, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना शीव – पनवेल महमार्गावर घडल्याने या मार्गावर रात्री वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून वाहनांना वाट मोकळी करून दिली. पोलिसांनी रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.