। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील तसेच मुंबई-गोवा महामार्गालगत आंबेवाडी नाका येथे बुधवारी (दि. 9) 9.30 वाजता गणेश मंदिरासमोर बायपास रोडच्या शेजारी एक इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे कोलाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते घटनास्थळी हजर होऊन त्याला आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत अधिक चौकशी केली असता लालूलाल सोनजी रेबाली वय 41, रा. बिछोरा जि. चितोडगड, राजस्थान असे मृत इसमाचे नाव असून त्याचा मृत्यू कोणत्या तरी आजाराने झाला असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली एन. झेड. सुखदेवे करीत आहेत.