पुण्यामध्ये व्यावसाईक वादातून गोळीबार; परिसरात भीतीचे वातावरण

| पुणे | वृत्तसंस्था |

हडपसरमधील शेवाळेवाडी येथे एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिक ठेकेदारावर दिवसा गोळीबार केल्याची घटना घडली आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास शेवाळवाडी येथील संपन्न होम सोसायटी समोर दोन ठेकेदारांमध्ये सिक्युरिटी कामगारांवरून वाद झाला होता. या वादातून शेवाळेवाडीत दिवसा गोळीबार झाला आहे. त्यामुळे या परिसरात भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नागिरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गोळीबारात जयवंत खलाटे जखमी झाले आहेत. यांना उपचारासाठी आर्मी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी ऋषिकेश शेंडगे व सुधीर शेंडगे या दोघांना संशयित आरोपी म्हणून हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही आरोपी एक माजी सैनिक असून दुसरा आरोपीचाच मुलगा आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

Exit mobile version