| मुंबई | प्रतिनिधी |
मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर तेथे मनसेतर्फे हनुमान चालिसाचे पठण केले जाईल,या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घोषणेवर वंचित बहुजन समाजाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी टीका केली असून,राज ठाकरे यांनी प्रथम आपला मुलगा अमित ठाकरे यांच्याकडून हनुमान चालिसा पठन करुन घ्यावी,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
मशिदीवर मोठे भोंगे लावले तर त्याठिकाणी हनुमान चालिसा वाचली जाईल या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या विधानाला 100 टक्के पाठिंबा देतो फक्त अमित ठाकरे यांनी पहिल्यांदा त्याचा शुभारंभ करावा याकरिता एकाही बहुजन माणूस नका जानवे घालून हनुमान चालीसा म्हणण्याला माझी हरकत नाही. माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती आहे, तुम्ही शरद पवारांची मुलाखत घ्या किंवा उभा पक्ष प्रस्थापित पक्षाच्या प्रचारासाठी उसना द्या मात्र तुमचा संपलेला पक्ष जातीय तेढ निर्माण करून होणार्या दंगलीवर उभा करू नका,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सुजात आंबेडकर यांची पहिली वाहिली राजकीय सभा रविवारी राहुल नगर नंबर 1 येथे पार पडली. या प्रसंगी सुजात यांनी पक्ष बांधणी, विस्तार, विरोधक सगळ्यांचा समाचार घेतला. वंचित बहुजन आघाडीचा अपप्रचार करण्यासाठी पक्षाचा बी टीम म्हणून उल्लेख केला जात होता. मात्र पहाटेचे सरकार स्थापन करून विश्वासार्हता कोणी गमावली आहे याचा प्रत्येकाने विचार करावा. लाटेवरती स्वार होऊन कोणीही निवडणूक जिंकू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तम उदाहरण आहे. मात्र यंदा आपल्या निवडणूक निव्वळ जिंकायची नसून मोठ्या प्रमाणात सत्ता देखील स्थापन करायची आहे. असा दावाही त्यांनी केला. याप्रंगी मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान, मुस्लिम बहुजन आघाडीचे सय्यद मंजूर, मुंबई निरीक्षक कलम खान, मुंबई महासचिव आनंद जाधव, मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा अध्यक्ष कृतिका जाधव, सतीश अमुलगे, तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, संध्या पगारे, प्रबुद्ध भारत उपसंपादक जीतरत्न पटाईत, राज्य सदस्य अक्षय बनसोडे, वर्ड अध्यक्ष शिंगोरे, वर्ड अध्यक्ष महिला दीक्षा शेगोकार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.