मुंबईत जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एका पुरुषाला दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच गुडलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहणारा हा व्यक्ती असून त्याच्यावर महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे GBS ची लागण लागली आहे. हा व्यक्ती अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहतो. सध्या त्याच्यावर महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळं अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली आहे. मुरजी पटेल यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली. तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी 50 विशेष बेड राखीव ठेवावे, अशी सूचना केली आहे. तसेच या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जावेत, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

Exit mobile version