। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
पुणे, मुंबईनंतर कोल्हापुरात जीबीएस (गुलियन बॅरे सिंड्रोम) या आजाराच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. चंदगड तालुक्यातील एका 60 वर्षीय महिलेचा शुक्रवारी (दि. 14) उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
राज्यात सध्या जीबीएस आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. या आजाराची लागण झालेल्या काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आजाराने आता कोल्हापूरमध्येही शिरकाव केला आहे. चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील 60 वर्षीय महिलेला जीबीएस आजाराची लागण झाली होती. तिला तीन दिवसांपूर्वी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार चालू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.