| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वेश्वी -अलिबाग, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयाचा दबदबा कायम राहिला आहे. ग. बा. वडेर हायस्कूल व ब. ग. ओसवाल ज्युनिअर कॉलेज पाली व जिल्हा क्रीडा विभाग अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत 19 वर्ष वयोगट मुलींमध्ये पी. एन. पी. कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हा पातळीवर आपला दबदबा कायम ठेवला आहे.
या करिता क्रीडा प्रशिक्षक तेजश म्हात्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पाटील यांनी अभिनंदन केले.