मच्छीमार बांधवांवर पुन्हा संकट

| आगरदांडा | प्रतिनिधी |

1 जुन ते 31 जुलैपर्यंत मासेमारी करण्यास बंदी असल्यामुळे यादरम्यान सर्वच बोटी किनाऱ्यावरच होत्या. नारळी पौर्णिमाच्या दुसऱ्या दिवसांपासून मासेमारीला सुरूवात करण्यात आली. परंतु, सतत 5 दिवस पडणाऱ्या पावसामुळे त्यात समुद्र खवळत असल्याने मासेमारी गेलेल्या बोटीतील नाखवांनी व खलाशांनी आप आपल्या बोटी आगरदांडा बंदर व दिघी बंदरा जवळील समुद्रात नांगर टाकून उभ्या केल्या आहेत. यामध्ये राजपुरी, मुरुड, एकदरा, दिघी, वेरावळ गुजरात, रत्नागिरी पाजपंढरी, हरणाई, अलिबाग व वर्सोवासह बंदर भागातील अश्या 150 बोटी आहेत.या बोटी वादळ कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या वादाळामुळे कोळी मच्छीमार बांधवांवर पुन्हा संकट आले असून तो आर्थिक संकटात सापडला आहे.

Exit mobile version