मच्छीमारी नौकेला जलसमाधी; खलाशाचा बुडून मृत्यू

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन शहरातील जीवनाबंदर जेट्टी जवळ एका नांगरून ठेवलेल्या मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळावी. या नौकेमध्ये झोपलेल्या एका खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.14) मध्यरात्री घडली आहे. अतिक हबीबुल्ला खलीफे वय 47 रा. हबीब कॉम्प्लेक्स, बाजारपेठ श्रीवर्धन यांच्या मालकीची मासेमारी नौका श्रीवर्धन येथील जीवनाबंदर जेट्टीच्या जवळ नांगरून ठेवलेली होती. अचानक ही नौका पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. या नौकेमध्ये मूळचा हरलापूर, जिल्हा गदग, राज्य कर्नाटक येथील मूळ रहिवासी हनुमंत थांगुड गौद्रा हा दारूच्या नशेत झोपलेला असताना नौकेला जलसमाधी मिळाल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत या नौकेचे मालक अतिक हबीबुल्ला खलिफे यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस हवालदार विनोद गायकवाड यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार विनोद गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version