| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात अवजड वाहनांच्या वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर, 12 जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी रविवारी (दि.27) दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी सातच्या सुमारास बैतुल-परासिया रोडवरील हनुमान डोलजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीी पलटी झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले. यासोबतच बैतूल-अथनेर रोडवर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वारासह तिघांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा 12 वाजता हा अपघात झाला. मयत झालेले तिघेही फर्निचरचे काम करून घरी परतत होते. बैतुलच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमला जोशी यांनी सांगितले की, बळी पडलेले मजूर हे ट्रॅक्टर-ट्रॉलीतून बैतुल रेल्वे स्थानकावरून आपल्या गावी घरी परतत होते.