पाच लाखाची रोकड लंपास

| अलिबाग | प्रतिनिधी |

अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून पाच लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना कुरुळ येथे रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी रात्री अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बांधकाम कामे करणारे कुरुळ येथील समीर पाटील यांच्या घरात ही चोरी झाली आहे. शनिवारी सायंकाळी चार ते सहा वाजण्याच्या सुमारास कपाटातील रोख रक्कम काढण्यासाठी ते गेले होते.त्यावेळी ती रक्कम त्यांना आढळून आली नाही. त्यांनी घरात अनेकांना विचारणा केली.त्यांनी ठिकठिकाणी चौकशीदेखील केली. तरीही रक्कम सापडली नाही. त्यामुळे शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Exit mobile version