| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील एका दुकानातून बांधकामाचे साहित्य लंपास करण्यात आले आहेत. ही घटना 14 ते 17 जूलैच्या दरम्यान घडली असून अज्ञात दोघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरुळ येथील गंगाराम सुभेदार यादव हे बांधकाम व्यवसायिक आहेत. 14 जूलै ते 17 जूलैच्या दरम्यान गावांमधील रिना पाटील यांच्या दुकानामध्ये बांधकामांचे साहित्य ठेवले होते. त्याठिकाणी कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानामधील 63 लोखंडी प्लेटी चोरून नेल्या. एकूण 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरण्यात आला आहे. दोन अज्ञातांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. आर. महाले करीत आहेत.