सेबीमध्ये ध्वजारोहण उत्साहात साजरा

। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा येथील एनआयएसएम सेबी येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डायरेक्टर डॉ.सी.के.जी.नायर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अर्थव्यवस्थेचे प्रशिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने सतरा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यानंतर इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांची दोरीखेच स्पर्धा पार पडली.यावेळी सुनील कदम, लेफ्टनंट कर्नल तथा जनरल मॅनेजर रमेश कुमार आदींसह मान्यवरांसह एनआयएसएम स्टाफ,विद्यार्थी ,गार्ड कुटूंबिय उपस्थित होते.

Exit mobile version