उड्डाणपुलाचे काम सुरू; प्रितम म्हात्रे यांनी केली पाहणी

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल-माथेरान रोडला जोडणार्‍या जीर्ण झालेल्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी होत होती. पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन वाहनचालक जखमी झाले होते. मुखत्वे करून रिक्षा आणि दुचाकीस्वारांना याचा खूप त्रास होत होता. यामुळे नवीन पनवेलचे नागरिक त्रस्त झाले होते. वाहतूक विभागाची परवानगी मिळाल्यानंतर सिडकोच्या माध्यमातून कामाला सुरुवात करण्यात आली. दि. 20 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

याचप्रमाणे एमएसआरडीसी अंतर्गत ठाणा नाका ते खांदा कॉलनी येथे जाताना रेल्वे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागासोबत प्रितम म्हात्रे यांनी पाठपुरवठा केला होता. सदरच्या ठिकाणची परिस्थिती एमएसआरडीसी अधिकार्‍यांच्या नजरेस आणून त्या अनुषंगाने या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. गेली कित्येक वर्षे रखडलेले काम प्रीतम म्हात्रे यांच्या पाठपुरावामुळे सुरू झाले आहे. यासाठी संबंधित पूल हा वाहतुकीसाठी एक मार्गिका बंद करण्यात येणार आहे. अशा वेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविणेसंदर्भात वाहतूक शाखेच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. यासाठी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन विश्‍वकार यांच्यासोबत पर्यायी रस्त्यासंदर्भाची प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन त्यांनी पाहणी केली होती. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी बोर्ड लावणे आणि इतर आवश्यकत्या सूचना केल्या. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी केले आहे.

यावेळी माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज, डॉ. सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांच्यासमवेत मा. नगरसेवक राजेश हातमोडे, अनिल घरत, दीपक कुदळे, शिवराज साखरे, संदेश डिगोरकर, चिंतामणी गणेश मंडळाचे आश्‍विन डीचोलकर आणि सदस्य, नवीन पनवेलचे नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी प्रितम म्हात्रे आणि उपस्थित पदाधिकार्‍यांचे आभार मानत स्वागत केले.

Exit mobile version