पनवेल येथे फुटबॉल स्पर्धा उत्साहात

। पनवेल । प्रतिनिधी ।
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत पनवेल महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 ते 27 जुलैदरम्यान सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 14 वर्षे व 17 वर्षे मुले व 17 वर्षे मुली या गटात घेण्यात आलेली ही स्पर्धा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल येथील क्रीडांगणावर खेळविण्यात आली.

या स्पर्धेत 14 वर्षे मुलांच्या गटात प्रथम क्रमांक न्यू हॉरायझन पब्लिक स्कूल पनवेल, द्वितीय बालभारती पब्लिक स्कूल, खारघर-पनवेल, तर तृतीय क्रमांक सेंट जोसेफ हायस्कूल, पनवेलने पटकाविला. तर 17 वर्षे मुलांच्या गटात प्रथम क्रमांक एपीजे स्कूल खारघर पनवेल, द्वितीय न्यू हॉरायझन पब्लिक स्कूल पनवेल, तृतीय क्रमांक बालभारती पब्लिक स्कूल खारघर, पनवेल यांनी बाजी मारली. तर, 17 वर्षांखाली मुलींच्या गटात प्रथम क्रमांक रायन इंटरनॅशनल स्कूल खारघर पनवेल, द्वितीय रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर, तर तृतीय क्रमांक डीएवी इंटरनॅशनल स्कूल खारघरने पटकाविला. विजयी शाळा व खेळाडूंचे महानगपालिकेचे आयुक्त व तृप्ती सांडभोर यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version