विवाहित महिलेवर अतिप्रसंग; तरुणावर गुन्हा दाखल

| नेरळ | प्रतिनिधी |

अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव येथील महिलेच्या असहायतेचा फायदा घेवून कर्जत तालुक्यातील कळंब येथील तरुणाने सदर विवाहित महिलेवर अनेक वेळा अतिप्रसंग केला. तर त्या तरुणाचा गोरेगाव येथील मित्राने देखील संबंधित विवाहित महिलेशी लज्जा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्या दोन्ही तरुणांवर नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. ओळखीच्या बहाण्याने या विवाहितेशी संबंधित तरुणांनी शारीरिक संंबंध प्रस्थापित केले. तसेच लॉजवर या महिलेचे अश्‍लिल फोटो काढुन त्या महिलेला धमकावले. शिवाय मित्राला सोबत नेऊन त्या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकारात कळंब येथील तरुणाने त्या विवाहित महिलेचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या पतीच्या मोबाईल वर पाठवून दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित महिलेने आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे केली.

Exit mobile version