चोरट्यांचे पोलिसांसमोर आवहन
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामध्ये माणगाव शहरातील सुशिक्षित लोकांची सोसायटी समजल्या जाणार्या माणगाव-पुणे म्हणजेच दिघी-पुणे हायवेवर असलेल्या अमित कॉम्प्लेक्स वसाहतीत चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढत सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेत माणगाव अमित कॉम्प्लेक्समधील सुमारे तीन फ्लॅट व एक बंगलो चोरट्यांनी फोडला आहे. त्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अमित कॉम्प्लेक्सच्या बी विंगमधील रहिवासी ज्योती शंकर यांच्या घरातील 3 लाख किमतीचे सोने चांदीचे दागिने 80 हजार रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्यासमोर राहणारे हे शासकीय कर्मचारी असून, ते बॅचलर असल्याने त्यांनी आपल्या घरातून काय गेले, हे सांगणे टाळले आहे. मात्र, लाखोंचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी बंद दरवाजांचे कडी कोयांडा तोडून लंपास केला आहे, अशी माहिती समोर यामध्ये प्रसिद्धी माध्यमासमोर अनेक सीसीटीव्ही फुटेज व व्हिडीओ समोर आले आहेत. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांना गजाआड करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.