| महाड | प्रतिनिधी |
वाद कशावरून होईल हे काही सांगता येत नाही. असाच वाद महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रिव्ही कंपनीच्या कंत्राटी कामगारांमध्ये झाला. दारू पिण्यास बसलेल्या तिघा तरुणांमध्ये दारूचे समान वाटप झाले नाही यावरून वाद झाला आणि या वादातून एकावर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत महाड औद्योगिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही कंपनीच्या आवारात वेल्डिंगचे काम करणार्या कंत्राटी कामगारांमध्ये दि. 2 डिसेंबर रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास वाद झाला. जेवण करत असताना दारूचे समान वाटप झाले नाही यावरून मिथिलेश जवाहर सिंग याला राग आला. त्याने समोरील जेवण फेकून दिले. यातून मिथिलेश आणि प्रोसंजित या दोघांमध्ये वाद सुरू झाला. यातून मिथिलेशने शेजारी असलेल्या त्रिमूर्ती इंजिनिअरिंगमधून लोखंडी रॉड आणून मारहाण केली. यामध्ये प्रोसंजित शांती दास हा जखमी झाला आहे. याबाबत महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.