सव्वा सात लाखांचे विदेशी मद्य जप्त

रोहा तालुक्यात कारवाई
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुरुड राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करीत सुमारे सव्वा सात लाखांचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला.याप्रकरणी तिघाजणांना अटकही करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे, उप अधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोठणवाडी,कोकबन,ता. रोहा येथे व रोहा कोलाड बायपास रोड, थिम पार्क गार्डन जवळ,भाजी मार्केटच्या समोर ही कारवाई करण्यात आली.

अधिकारी कर्मचार्‍यांनी सापळा रचून बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणार्‍या चार चाकी एर्टिका सह 129.6 बल्क लिटर (एक बॉक्स मद्य = 8.64 बल्क लिटर) विदेशी मद्य जप्त करून एकूण तीन आरोपींना अटक केली. गोठणवाडी येथे एक आरोपी व विदेशी मद्य- 40 हजार 800 रुपये, रोहा येथे दोन आरोपी व एक वाहन- आणि बनावट विदेशी मद्य रुपये 1 लाख 12 हजार 800, अशा प्रकारे एकूण रुपये 7 लाख 25 हजार 600 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती,निरीक्षक आनंद पवार यांनी दिली आहे.

Exit mobile version