निसर्गरम्य डोंगरावर काळी चादर,भाविकांची हळहळ
सोगांव | प्रतिनिधी |
डोंगरावरील औषधी वनसंपत्तीबरोबरच इतर महत्त्वाच्या वनस्पती, सूक्ष्म जीव आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभागाला वणव्याची खबर समजताच वणवा ठिकाणी वनकर्मचारी यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
वणवाबाबतीत शेवटची माहिती हाती येईपर्यंत वनविभागाचे वनरक्षक पंकज घाडी व विशाल पाटील यांच्या मदतीला एक पर्यावरणमित्र संकेत राजेंद्र कवळे, यांनी आज विझवण्यासाठी सुरुवात केली होती, काही वेळाने वणव्याची माहिती मिळाल्यानंतर कुकुच कु कंपनीचे मालक व भाविक कुणाल पाथरे, यांच्यासोबत साईश पाथरे, विवेक जोशी यांनीसुद्धा वणवा ठिकाणी पिण्याचे पाणी व इतर अत्यावश्यक साहित्यासह उपस्थिती लावून मदतकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, नाराजीची बाब म्हणजे परिसरातील पंचक्रोशीतील फक्त सहाजणांकडून ही आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचे समजले.

वणवा लागल्याची माहिती या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना,पर्यावरणप्रेमींना समजताच त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. निसर्गरम्य डोंगरावर काळी चादर पसरून आता डोंगर काळेशार दिसणार म्हणून खंत देखील व्यक्त केली आहे. तसेच आग लावणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.