माजी फुटबॉलपटू एस.एस. हकीम कालवश

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
रोम येथील 1960च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी फुटबॉलपटू सय्यद शाहिद हकीम यांचे रविवारी गुलबर्गा येथील रुग्णालयात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. ‘हकीमसाब’ म्हणून त्यांना ओळखले जायचे. हकीम यांना काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय फुटबॉलशी तब्बल पाच दशकांहून अधिक काळ संलग्न राहिलेल्या हकीम यांना ध्यानचंद पुरस्कारानेसुद्धा गौरवण्यात आले.

Exit mobile version