। मुंबई। वृत्तसंस्था।
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी गुरुवारी सकाळी 8.20 वाजता अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना जुलैमध्ये रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. ते दीर्घकाळापासून वृद्धापकाळाशी संबंधित इतर आजारांनी त्रस्त होते. त्याच्यावर कोलकाता येथील घरी उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन
