साडेचार लाखांचे चोरटे खैर जप्त

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
| गोवे-कोलाड | वार्ताहर |

खांब गावाजवळ वनविभागाच्या पथकाने सापळा रचून विनापरवाना खैराच्या लाकडाची वाहतूक करणार्‍या टेम्पोला 4लाख 8 हजार 225रुपयांच्या मुद्दे्मालासहित पकडले व दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी उपवनसंरक्षक रोहा व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्‍वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रोहा, मनोज वाघमारे व वनपाल राजेंद्र गायकवाड,वनरक्षक एस. डी.देवकांबळे , एस एस भगत, एस एन शिद, एस एम मुळे,अंगद भोसले,मंगेश पव्हरे,तेजस नरे,योगेश देशमुख,पोपट करांडे,अजिंक्य कदम यांनी खांब गावाजवळ महेंद्रा टेम्पो ची तपासणी केली असता खैर सोळीव नग 48 घ.मी.0.558 किंमत 8255 रुपये व जप्त वाहन विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला.

सदर वाहनावर भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व खैर नग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी डिमाजी पवार रा.चिंचवली,व अनंता वाघमारे रा.पाले. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version