तळा नगरपंचायत निवडणुकीत चार अर्ज मागे

4 प्रभागांसाठी 14 उमेदवार रिंगणात
। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायत निवडणुकीत 10 डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 4 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, 4 प्रभागांसाठी निवडणूक रिंगणात 14 उमेदवार उभे आहेत. 4 प्रभागात शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप व अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत. यामध्ये प्रभाग क्र.1 मध्ये दुरंगी, प्रभाग क्र.3मध्ये तिरंगी, प्रभाग क्र.10 मध्ये चौरंगी, तर प्रभाग क्र.14 मध्ये पंचरंगी लढत पहायला मिळणार आहे.

Exit mobile version