| पनवेल | वार्ताहर |
रेल्वेस्थानकासमोरील झोपडपट्टीत अनेक दिवसांपासून बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याचे उजेडात आले आहे. पनवेल शहर पोलिसांच्या कारवाईत ही माहिती उघड झाली. पोलिसांनी या प्रकरणातील बेकायदा राहणार्या चार बांगलादेशींना अटक केली. यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी बेकायदा वास्तव्य करणार्या बांगलादेशींना पकडण्यासाठी आदेश दिले आहेत. यामुळे बेकायदा वास्तव्य करणार्या विरोधात कारवाईसाठी स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी सुद्धा पोलीस कर्मचार्यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पनवेल शहर पोलीस पथक पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील झोपडपट्टीत चौकशीसाठी गेल्यावर त्यांना अब्दुल रशीद अकबर, मोहम्मद नाजमुल हुसेन खा, मोहम्मद रजोब अली खा आणि 50 वर्षीय नाजमा बेगम रशीद खाँ असे चौघे विना पारपत्र सापडले. हे बांगलादेशातील जाशोर जिल्ह्यातील राहणारे आहेत.