। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ येथील साई मंदिर नाका येथून सकाळी सव्वा सात वाजता गोवंशीय जनावरे यांची तस्करी केली जात होती. चार गोवंशीय जनावरे यांना कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळताच काही गोरक्षक यांनी नेरळ पोलीस यांना कळविण्यात आले आणि नंतर पोलिसांनी त्या जवावरे यांची सुटका केली असून त्या सर्व जनावरे यांची रवानगी गोशाळेत नेण्यात आली आहे.
आरोपींनी एकूण अडीच लाख किमतीचे बैल,गाय, जनावरे नेली जात होती.त्या ठिकाणी गोवंशीय जनावरे यांच्या तस्करी वाहतुकीसाठी नेली जात होती.त्या जनावरांची वाहतूक करताना संबंधित वाहनचालक यांच्याकडे कोणत्याही पराकारचे जनावरे खरेदी केलेल्या पावत्या नव्हत्या. त्याचवेळी त्या जनावरे यांची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी केली नसल्याने त्या सर्व जनावरे यांची बेकायदेशीर वाहतूक करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ती सर्व जनावरे यांची कत्तलीकरीता चोरी करुन टेम्पोमध्ये दाटीवाटीने भरून त्यांची चारा-पाण्याची व्यवस्था न करता भरून घेवून जाताना पकडले आहे. या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.हवालदार गौतम वाघमारे अधिक तपास करीत आहेत.






