। पाली । वार्ताहर ।
माणसाने जिद्द आणि चिकाटी बाळगली की कोणतेही काम सोपे होते आणि यश तुमच्या पदरात पडते. पाली तालुक्यातील सिद्धार्थनगर नाणोसे गावची कन्या डॉ. रुपाली गायकवाड यांनी आयुर्वेदात घवघवीत यश संपादन केले आहे. रुपाली यांनी आयुर्वेदात एम.डी. ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
परळी पंचक्रोशीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गेणू सोमा गायकवाड व परळी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अनुसया गायकवाड यांची नात, चंद्रशेखर गायकवाड यांची डॉ. रूपाली या कन्या आहेत.अतिशय मेहनतीने व अभ्यासाच्या जोरावर डॉ. रुपाली गायकवाड यांनी हे यश प्राप्त केले आहे. मुंबई वरळीमधील पोद्दार आयुर्वेद मेडिकल कॉलेजमधून एम.डीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. हे करीत असताना प्रत्येक वर्षात प्रथम श्रेणीततून उत्तीर्ण झाल्या आहेत. जिद्द आणि जिकाटीच्या जोरावर त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले आहे.