| माणगाव | प्रतिनिधी |
माणगांव पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असताना अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. अशाच सामाजिक बांधिलकीतून माणगांव पोलीस ठाण्याचे पो. नि. राजेंद्र पाटील यांनी माणगांव पोलीस ठाणे हद्दीत फिरणार्या 3 व वाघाव बौद्धवाडी येथील 1 अशा एकूण 4 मनोरुग्णांना पुढील उपचारासाठी गुरुवार (दि.10) रुग्णालयात पाठविले आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना ही मनोरुग्ण महिला व एक इसम अशा दोन मनोरुग्णांबाबतची खबर मिळाली असता त्यांनी या दोघांना रत्नागिरी येथील वेड्यांच्या इस्पितळात धाडण्याचा निर्णय घेतला. व ते पुर्णतः बरे होऊन परत आले असून आता त्यांच्या कुटूंबियांसोबत आहेत.
माणगाव पोलीस ठाणे हद्दीत फिरणार्या 3 मनोरुग्णांना माणगाव पोलीस ठाणे येथे प्राथमिक उपचार करून व वाघाव येथील एका महिलेस असे एकूण 4 जणांना मानवतावादी कोकण संस्थेच्या सहाय्याने पुढील उपचारकरिता रुग्णवाहिकेमध्ये बसवून ठाणे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. या कामगिरी बद्दल माणगांवचे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांनी पो.उप निरीक्षक किर्तीकुमार गायकवाड, पो. शि. रामनाथ डोईफोडे, ओमले, कोंजे, कुवेसकर, प्रशांत पाटील व आपल्या पोलीस सहकारी टीमला खास धन्यवाद दिले आहेत.