। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
लांजा येथील शांतीनगर परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरला क्रेटा कारची पाठीमागून जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गोव्याहून मुंबईकडे येणारी क्रेटा कार (एमएच 01 सीपी 8021) उभ्या डंपरवर (एमएच 05 ईएल 3877) आदळल्याने हा अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. जखमींना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, लांजा पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
भीषण अपघात! उभ्या डंपरला कारची धडक; चौघांचा मृत्यू
