1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
| पेण | प्रतिनिधी |
पेण बोरगाव येथी सेलिब्रेशन रिसॉर्ट वरील कुंटणखाना (वेशाव्यवसाय) प्रकरणात आणखी चार आरोपींचा समावेश असल्याची माहिती पेण पोलीस ठाण्यातून मिळाली आहे.
अगोदर अटक केलेले चार आरोपी जुल्फिकार जलाल उद्दिन, खगेंद्र कंम्बुमलीक, देवेंद्र पाटील, रविंद्र मलीक यांच्याकडून पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या कुंटणखाना प्रकरणात आणखी चार आरोपींची नावे पुढे येत असून यामध्ये गणेश अण्णा, सुनिल कुमार मेहता, गणेश सुरेश गायकर, आणि एक आरोपीचे नाव पोलीसांनी गुप्त राखले आहे. तरी या चारही आरोपींचा शोध पेण पोलीस ठाणे करत आहेत. तसेच अगोदर अटक असलेले चार आरोपी जुल्फिकार जलाल उद्दिन, खगेंद्र कंम्बुमलीक, देवेंद्र पाटील, रविंद्र मलीक यांना 30 एप्रिलपर्यंत दिलेल्या पोलीस कोठडीची मुदत संपली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता अधिकच्या तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी विनंती पोलीस खात्याकडून न्यायालयात करण्यात आल्याने सदरील चारही आरोपींना 2 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली आहे. 1 एप्रिल पर्यंत पोलिसांना अधिकचा तपास करण्यासाठी वेळ मिळणार आहे.
जे चार आरोपी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या बरोबर आणि रिसॉर्ट मालकाबरोबर कोणताही भाडेतत्वाचा करार झाला नाही, अशा प्रकरची माहिती पोलिसांकडून उपलब्ध होत आहे. तसेच जर अशा प्रकारचा करार झाला असला तर तशा प्रकारचे लेखी दस्तावेज पोलीस ठाण्यात हजर करण्याचे लेखी रिसॉर्ट मालकाला कळविले होते. तरी आजपर्यंत अशा प्रकारची कोणतीही माहिती पोलीस ठाण्यात सेलिब्रेशन रिसॉर्ट मालकाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे नक्कीच हे प्रकरण आता एक नवीन वळन घेणार असल्याचे बोलले जात आहे.
