। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
छत्रपती संभाजीनगरच्या शेवगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. आजी आजोबांनी आपल्या 14 वर्षांच्या नातीचे दोन लाख रूपये घेऊन लग्न लावले.
शेवगाव तालुक्यातील चौदा वर्षीय मुलीचे लहानपणीच आई वडीलांचे छत्र हरवले होते. काही दिवस काकांनी सांभाळ केला, त्यांनाही ती जड झाली. त्यानंतर आजी आजोबांकडे राहायला आली. आजी-आजोबांनी एका कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेऊन तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर दोन महिन्यात पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यासाठीचा त्रास असह्य झाला आणि मुलीने पोलिसांना मदत मागितली. यानंतर दामिनी पथकाने या मुलीची सुटका केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.