| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या वांद्रे खेरवाडी परिसरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकी चालकाला धडक दिली, यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानव पटेल, हर्ष मकवाना हे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोटारसायकलवरुन चालले होते. पाठीमागून एका मारुती बलेनो कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक केली आहे. चालक सिद्धेश बेलकर, अवनीश अरुण कुमार मौर्य, ओम नागवेकर, प्रशांत यादव या चौघांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.